शरद पवार हे आयसीएआर सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीत सोसायटीच्या पायाभूत यंत्रणेचाच विकास झाला नाही तर तिच्या मानवी साधनसंपत्तीतही अमूल्य भर पडली आहे. संशोधनाच्या क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक नव्या गोष्टीत पवारसाहेबांना रस असतो. माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, जेनेटिक इंजिनियरिंगसारख्या क्षेत्रांचीही त्यांना अद्ययावत माहिती आहे. देशातील एखाद्या लॅबोरेटरीस ते भेट देतात तेव्हा तेथील प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा आणि काही नवे ज्ञान मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या अनंत प्रकारच्या गोष्टी व विषय ते लक्षात तरी कसे ठेवतात याचे आश्चर्य वाटावे. त्यांच्या पुढाकारामुळेच आता आयसीएआरने
- ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन बायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट (बारामती),
- ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्ट्रेस’ (रायपूर) आणि
- ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी’ (रांची)
या अभिमत विद्यापीठ दर्जाच्या तीन नव्या संस्था सुरू केल्या आहेत. हे झाले कृषिविषयक काम.
आज राज्यातील ग्रामीण भागांतील ग्रामपंचायतींमध्ये महिलांना ५०% आरक्षण आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांमध्ये आपल्या भगिनी ५०% आरक्षण घेऊन काम करीत आहेत. धडाडीने निर्णय घेत आहेत. खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये स्त्री-पुरुषांची समानता पवारसाहेबांमुळे शक्य झाली आहे. त्यांचा निर्णय अचूक आहे हे ठरविण्याचे काम आपल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या भगिनी करीत आहेत.
सामाजिकदृष्ट्या समतोल ढळू न देता, समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा ताकदीचा एकमेव महानेता म्हणून आज शरद पवारांकडे पाहिले जात आहे.
आदिवासींचे वेगळे बजेट करण्याचे काम करणारा पहिला नेता कोण असेल तर शरद पवार! त्यांनी आदिवासींना हक्काचा वाटा दिला.
पवारसाहेबांची निर्णयक्षमता वाखाणण्याजोगी आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय असो, शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय असो, या सर्व निर्णयांसाठी पवारसाहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी कृषी खात्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्यामुळे धान्यउत्पादन वाढले.
नव्या विचारांचा स्वीकार करून केवळ चर्चा न करता अधिकाराचा योग्य वापर करीत शरद पवारांनी महिलांसाठी अनेक निर्णय घेऊन अमलात आणले. मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारी नोकरीत महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
महिलांसाठी त्यांनी घेतलेला आणखी एक निर्णय म्हणजे वडलांच्या आणि नवऱ्याच्या संपत्तीमध्ये ५०% आज भागीदारी. त्यांनी तसा कायदा करून घेतला. हे क्रांतिकारक पाऊलच म्हणावे लागेल-
म्हणूनच सक्षमीकरणासाठी, विकासासाठी नेमके काय करायला पाहिजे याची जाण असणारा महानेता म्हणूनच शरद पवारांचा उल्लेख करावा लागतो.
सामाजिक बांधिलकी आणि स्वतंत्र विचार
पक्षीय राजकारणाच्या चौकटीबाहेर विचार करून स्वत:च्या विवेकाला स्मरून व लोकेच्छेचा आदर करून पवारसाहेबांनी काही धाडसी निर्णय घेतले. प्रसंगी त्यासाठी त्यांना स्वकियांविरोधातही भूमिका घ्यावी लागली. पण त्यांनी ती ठामपणे घेतली व यशस्वीपणे निभावली देखील. याचे अतिशय प्रभावी उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस.
राष्ट्रवादी कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेस हा नवीन पक्ष आहे. कॉंग्रेस पक्षाला शेकडो वर्षांची आहे. भारतीय जनता पक्षाची परंपरा जुनी आहे. कम्युनिस्ट पक्ष अनेक वर्षांपासून काम करणारा आहे. अनेक पक्ष असे आहेत कुणाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत तर कुणाच्या ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला तर अजून पंधरा वर्षेही पूर्ण झालेली नाहीत. तरीही आनंदाची गोष्ट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील एकही गाव असे नाही की ज्या गावात राष्ट्रवादीचा विचार घेऊन लोकांच्या सुख दु:खात सहभागी होणारा कार्यकर्ता तेथे नाही. आज सगळ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पसरलेला आहे. तो राज्यामध्ये काम करतो, देशामध्ये काम करतो. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने लोकांसाठी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. म्हणून तो मजबूत करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष आहे. राष्ट्रवादी ही एक संघटना आहे. राष्ट्रवादीमध्ये महिलांचे स्थान महत्त्वाचे आहे. म्हणूनच महिला संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमध्ये महिलांना सामावून घेण्याची आग्रही भूमिका पक्षाने अगोदरच घेतली आहे.
युवतींना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी, जे प्रश्न युवतींना भेडसावतात त्याला वाचा फोडण्यासाठी ‘राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस’ ची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यभरातील युवतींच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी मुंबईच्या प्रदेश कार्यालयात नवी प्रणाली राबावण्यात येत आहे.