भारतातील आर्थिक व सामाजिक संक्रमणाचा वेध घेणाऱ्या ‘स्पर्धा काळाशी’ या अरुण टिकेकर संपादित या शरद पवारांच्या भाषणांच्या पुस्तकात माजी पंतप्रधान माननीय डॉ. मनमोहन सिंग म्हणतात, ‘आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला स्मरण होते. किंबहुना, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८० च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता.