व्यक्तिमत्व

जाणता लोकनेता

भारताच्या राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत कर्तबगारकणखर व कुशल नेतृत्वतळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणाराजनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शीपारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार.

सामान्यांना आपलेसे करणे ही मोठी कठीण गोष्ट असते. शरद पवारांना ती लिलया जमते; कारण ते जनसामान्यांच्या प्रश्नसमस्यांना मनापासून भिडतात. लोकांच्या गरजा ओळखून प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या कामात गढून गेलेले शरद पवार त्यांच्या हरएक कृतीकार्यातून बघायला मिळतात. असाच नेता लोकांना ‘आपला’ वाटतो. कारण या नेत्याच्या शब्दांत पोकळ आश्वासन नसते तर प्रयत्नांच्या पूर्ततेची खात्री असते. कारण स्वत: शरद पवारांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते तेव्हाच एकत्रित जनशक्तीची जाणीवही असते.

शरद पवारांपाशी उद्याच्या भारताविषयी सुस्पष्ट असे भविष्यांकन आहे. आतापर्यंत काय झाले, राज्यकर्त्यांकडून कोणत्या चुका झाल्या, प्रगती कशी रोखली गेली, भविष्यात काय काय व्हायला पाहिजे, या संदर्भात खास त्यांचा स्वत:चा असा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनामुळेच, टीका झाली तरी तिच्यावर मात करून पुढे जाण्यातील सातत्य ते राखू शकतात.

मर्मज्ञ रसिक

शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेजाणता लोकनेताद्रष्टासंकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे.याशिवाय महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्यसंस्कृतीसंगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार!

कोणत्याही गोष्टीच्या मूळापर्यंत जाण्याची सवय आपला व्यासंग वाढवते, अभ्यासाची ओढ लावते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार! अभ्यास-सायास-प्रयास या गोष्टी व्यक्तिगत जीवन घडवीत असतात. शरद पवारांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वात हे सारे कंगोरे आढळून येतात.

पवारसाहेबांचे सर्वांत मोठे वेगळेपण म्हणजे ते आपला मंत्रिपदाचा अधिकार आणि ज्ञान यांची अजिबात गल्लत करीत नाहीत. आपल्याकडे सत्तापद आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी जे ज्ञान लागते ते आपल्याकडे आहेच अशा भ्रमात अनेक राजकारणी असतात. परंतु पवारसाहेब याला अपवाद आहेत. त्यांचे वाचन चौफेर आहे. ते फक्त वाचनावर थांबत नाहीत. त्यातून ‘टिपणे’ तयार करून त्यावर मनन-चिंतन करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. या अभ्यास व व्यासंगाचा त्यांना वेगवेगळ्या स्तरांवरील नागरिकांमध्ये मिसळताना फार उपयोग होतो. शास्त्रज्ञ असो वा सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता असो वा एखादा खेळाडू वा कलावंत, व्यापारी असोत वा महिला वा आदिवासी या सर्वांमध्ये ते सहज रमतात परंतु त्यांपैकी प्रत्येकाकडून ते स्वत: काही ना काहीतरी शिकतातही.

पवारसाहेबांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अनेक सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय विचारधारांचे मनोज्ञ मिश्रण आह.

साहित्य-संस्कृतीची उत्तम जाण असलेला शरद पवारांसारखा नेता दुर्मीळच म्हणावा लागेल.

साहित्य हा संस्कृतीचा आरसा असतो. आपल्या संस्कृतीची ओळख आपल्याला त्यातूनच होत असते. जुन्या-नव्या साहित्याच्या वाचनाने माणूस परंपरा व आधुनिकतेशी जोडलेला राहतो. पवारसाहेबांच्या अफाट वाचनामुळेच त्यांच्या मुळातल्या सकस व्यक्तिमत्त्वाला वैचारिक सुदृढतेची जोड मिळाली आहे.

संगीताच्या आस्वादामुळे त्यांच्यातील रसिकपणातला ताजेपणा मिळत राहिलेला आहे आणि या जाणत्या आणि कृतिशील रसिकामुळे साहित्य-संगीत-क्रीडा आदी क्षेत्रांच्या विकासकार्यास हातभार लागत आलेला आहे.  पवारसाहेबांचे शास्त्रीय संगीताबद्दलचे प्रेम तर सर्वज्ञात आहे. या प्रेमापोटीच त्यांनी आजवर अनेक कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. दिवंगत गायक पंडित भीमसेन जोशी यांच्याबद्दलचा त्यांचा आदरही सर्वांना ठाऊक आहे. पंडितजींना त्यांच्या निधनापूर्वी ‘भारतरत्न’ किताब मिळाला ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे.

संवेदनशील लोकनेता

राजकारणाच्या धकाधकीत मनाची सर्जनशीलता जपलेला एक संवेदनशील लोकनेता म्हणजे शरद पवार!

मानवी जगण्याशी संबंधित काही काही क्षेत्रे अशी असतात की तिथल्या रखरखाटामुळे माणसाची संवेदनशीलता, भावुकता, अलवारता करपून जावी. उदा. वैद्यकीय क्षेत्र, पोलिस खाते, लष्कर…. तसेच राजकारण!

प्रदेशाचे-देशाचे प्रश्न-समस्या सोडवण्यात गुंतलेले राजकारणी राक्षसी सत्तास्पर्धेत रुक्ष होत नाही गेले तरच नवल! मात्र असे नवल घडते शरद पवारांच्या रूपाने! अर्थात आजवर भारताला अनेक दिग्गज मर्मज्ञ असे रसिकता जोपासणारे राजकारणीही लाभले. त्यांत मुख्य स्थान शरद पवारांना द्यावे लागते.

हळुवार अशी संवेदनशीलता लाभलेला शरद पवार हा संवेदनशील माणूस ‘लोकनेता’ होतानाही संवेदनशीलच राहिला किंबहुना ही अखंड जागती संवेदनशीलताच त्यांना ‘लोकनेता’ या उपाधीपर्यंत घेऊन गेली.

दुसऱ्याच्या दु:खाने माणूस म्हणून डोळ्यांत पाणी येणारा जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतियुक्त यशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो लोकनेता म्हणून गणला जातो; आणि यातील सातत्य तो जेव्हा टिकवून ठेवतो तेव्हा तो ‘संवेदनशील लोकनेता’ म्हणून लोकांना आपला वाटतो.

मनाची सर्जनशीलता नवनिर्मितीचा पाया ठरते. कल्पक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी हीच सर्जनशीलता उपयोगी पडते. इतरांना सुचू न शकणाऱ्या असंख्य हितकारक कृती-उपायांचा खजिना त्यांच्यातील सर्जनशीलता सतत लोकांसाठी खुला करीत असते. मग निमित्त कृषिविकासाचे असो, पाणी-समस्येचे असो, लढाई-दंगलीचे असो, साहित्य-संस्कृती विचारविनिमयाचे असो किंवा अन्य काही!

जनसमूहाला समृध्दीच्या, भरभराटीच्या, विकासाच्या, उन्नतीच्या वाटा दाखविणारी आणि प्रचंड मोठ्या जनसमूहाला एकत्रितपणे त्या वाटेवरून घेऊन जाणारी प्रगाढ क्षमता शरद पवारांच्या सर्जनशील संवेदनशीलतेत आहे याचे प्रत्यंतर आपल्याला ठायी ठायी आलेले आहे.

सध्याच्या सर्व नेतेमंडळींच्या मांदियाळीत पवारसाहेबांचे स्थान अपूर्व व अद्वितीय असे आहे. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रगतीची नेमकी दृष्टी असलेला एक प्रचंड अभ्यासू व सेवाभावी कार्यकर्ता दडलेला आहे.

ते सदैव कालच्या अभियानास आजच्या कामाची जोड देऊन उद्याच्या भविष्याची मांडणी करीत असतात आणि यांतच त्यांचे सारे वेगळेपण दडलेले आहे.

एकमेव महानेता

कुशाग्र बुध्दिमत्तातीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात कोणी असेल तर तो म्हणजे शरद पवार!

खेळांवरील प्रेम

शरद पवारांचे खेळावरील प्रेम व खेळाडूंविषयी वाटणारी आत्मीयता तर सर्वश्रुतच आहेत्यांच्या संघटनकौशल्याचा लाभ भारतीय क्रीडाक्षेत्राला गेली अनेक वर्षे होत आहे.

सुरुवातीपासून खेळाच्या संघटनांना पाठिंबा देऊन संघटनात्मक पातळीवरती मजबुती आणून त्याचा खेळाडूंना कसा फायदा होईल यासाठी शरद पवारांनी अथक प्रयत्न केले. विविध खेळांच्या राज्य व राष्ट्रीय पातळींवरील संघटनांमध्ये मानाची व महत्त्वाची पदे भूषविली आहेत. विशेषत: कबड्डीचा आज जो विकास झाला आहे त्या पाठीमागे शासकीय आधार मिळवून दिला तो महत्त्वाचा आहे. खेळाडूंना योग्य तो फायदा मिळवून देण्यासाठी नियम व कायदे बनविणे हे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे.

आशियाई क्रिकेट परिषद, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना यांसारख्या संस्था-संघटनांचे अध्यक्षपद भूषवून आपल्या क्रीडाप्रेमाची ग्वाही शरद पवार यांनी दिलेली आहे.

पवारसाहेब नेहमीच व्यापक स्तरावर विचार करतात. क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. खेळाचे महत्व जाणून राष्ट्रीय पातळीवर खेळ व खेळाडू यांना पुढे आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहीलेले आहेत. कुस्ती, कबड्डी, क्रिकेट यांसारख्या खेळांच्या व खेळाडूंच्या विकासासाठी त्यांनी शासकीय पाठबळ पुरवले आहे.

कुस्ती जेव्हा मॅटवर खेळली जाऊ  लागली तेव्हा खर्चाच्या मंजुरीसाठी खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागली नाही.

खेळाडूंचे व्यक्‍तीगत भले झाले पाहिजे ही बाब खेळाच्या संदर्भाने ते विचारात घेतात.

क्रिडाक्षेत्रातील सांघिक प्रगतीचे महत्व ते जाणतात. अर्थात, म्हणून त्यांनी खेळाडूंच्या निवासाच्या प्रश्नांकडे, नोकरयांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही.